सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी विवेक देबरॉय यांची नियुक्ती - २६ सप्टेंबर २०१७

आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी विवेक देबरॉय यांची नियुक्ती - २६ सप्टेंबर २०१७

* अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल सरकारमधील असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची पुनर्रचना केली असून ही परिषद पंतप्रधानांना आर्थिक धोरणाबाबत सल्ला देईल.

* नीती आयोगाचे सदस्य असलेले अर्थतज्ञ विवेक देबरॉय हे परिषदेचे अध्यक्ष असतील. युपीए सरकारच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेली आर्थिक सल्लागार परिषद नव्या सरकारच्या काळात विस्मुतीत गेली होती.

* या परिषदेवर मे २०१४ पासून नियुक्त्याही झाल्या नव्हत्या आता ३ वर्षानंतर मोदी सरकारने या परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे.

* माजी अर्थ सचिव आणि नीती आयोगाचे मुख्य सल्लागार रतन वातल हे परिषदेचे सचिव असतील. या परिषदेत एकूण ५ सदस्यांचा समावेश असून हे परिषद आर्थिक सल्ला देण्याचे काम करेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.