शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

संयुक्त राष्ट्रसंघाचा व्यापार आणि विकास अहवाल - १६ सप्टेंबर २०१७

संयुक्त राष्ट्रसंघाचा व्यापार आणि विकास अहवाल - १६ सप्टेंबर २०१७

* अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचा व्यापार आणि विकास अहवाल प्रकाशित झाला असून त्यात प्रामुख्याने नोकऱ्यावर रोबोचे आक्रमण व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या वेतनाच्या नोकऱ्याना फटका बसेल असे नमूद करण्यात आले आहे.

[ अहवालातील मुद्दे ]

* रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विकसित देशामध्ये उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. सध्या तरी विकसनशील देशांचा त्याची झळ बसलेली नसली तरीही अशा देशामधील अपरिपकव औद्योगिक धोरण भविष्यात नोकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

* विकास प्रक्रियेचा भाग असलेल्या औद्योगिक धोरणाचे लाभ रोबोटिक्स मुळे हिरावले जातील काय अशी चिंता भेडसावू लागली आहे.

* अशा परिस्थितीत उद्योगक्षेत्राला पूरक अशा डिजिटल धोरणाची आवश्यकता आहे. धोरणकर्त्यांना हे आवाहन असल्याचे सांगितले आहे.

* सध्या जगात २० लाख कंपन्यांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. हा उपयोग जर्मनी, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन आदी देशामध्ये एकवटला आहे.

* ऑटोमोबाईल क्षेत्र, रबर, प्लॅस्टिक, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल यंत्रसामुग्री आदी उत्पादनासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरले जाते.

* ही क्षेत्रे अधिक वेतनमानाची मानली जातात. तुलनेने कागद उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, तयार वस्त्रप्रावरने या उद्योगामध्ये याचा वापर अल्प आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.