गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

जगात स्पर्धात्मक देशांच्या यादीत भारत ४० व्या क्रमांकावर - २९ सप्टेंबर २०१७

जगात स्पर्धात्मक देशांच्या यादीत भारत ४० व्या क्रमांकावर - २९ सप्टेंबर २०१७

* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताचा ४० वा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान एका पायरीने घसरले आहे.

* या यादीत एकूण १३७ देशांचा समावेश असून त्यात स्वित्झर्लंड पहिल्या, अमेरिका दुसऱ्या, सिंगापूर तिसऱ्या स्थानावर आहे. चीन २७ व्या स्थानावर आहे.

* अहवालात म्हटले आहे की दोन वर्षात मोठी झेप घेतल्यानंतर भारत आता स्थिरावला आहे. अर्थव्यवस्थेत अनेक क्षेत्रात भारताची कामगिरी सुधारली आहे.

* भारतात व्यवसाय करण्याच्या मार्गात भ्रष्टाचार हाच सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा आहे. असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* ब्रिक्स देशांपैकी चीन आणि रशिया भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आफ्रिका व ब्राझील देशांचे स्थान अनुक्रमे ६१ व ८० वे आहे.

* दक्षिण आशियात भारत सर्वोच्च स्थानी आहे. त्यापाठोपाठ भूतान ८५, श्रीलंका ८५, बांगलादेश ९९, पाकिस्तान ११५ व्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.