शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

राज्यात २०० शेतीगट स्थापन करण्यात येणार - ८ सप्टेंबर २०१७

राज्यात २०० शेतीगट स्थापन करण्यात येणार - ८ सप्टेंबर २०१७

* शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत वाढीचे लक्ष्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामूहिक शेती करण्यासाठीची आधुनिक पद्धती व नियोजनाची आवश्यकता आहे. 

* त्यासाठी सरकारने शेती गटामार्फत गटशेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी शासन विविध योजनांवर भर देत आहे. 

* पीक उत्पादन वाढवण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी माल प्रक्रिया व पणन आदींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 

* लोकसंख्या वाढीबरोबरच शेतीची धारण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. कृषी गणना २०१०-११ च्या अहवालानुसार राज्यात ४.२८ हेक्टर धारण क्षमता सातत्याने कमी होऊन २०१०-११ मध्ये १.४४ हेक्टर प्रतीखातेदार, शेतकरी इतकी कमी झाली. काही ठिकाणी ती ११ ते १५ गुंठे एवढी कमी आहे. 

* अशा छोट्या क्षेत्रावर शेती करणे व आर्थिकदृष्ट्या उत्पादन घेणे अत्यंत कठीण झाले आहे. या सर्व समस्यांवर सामूहिक शेतीच तारणार असल्याचे या पद्धतीने शेती करण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

* यासाठी राज्यात २०० शेतीगट स्थापन करण्याचे नियोजित असून याची सर्व माहिती जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडे सोपविली आहे. 

* या योजनेसाठी किमान २० शेतकरी समूहाच्या माध्यमातून १०० एकरवर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व पूरक उपक्रम राबविण्यासाठी सदर गटास एक कोटी रुपयांपर्यंत अनुदानाची तरतूद आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.