रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

काही वर्षात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार - १८ सप्टेंबर २०१७

काही वर्षात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार - १८ सप्टेंबर २०१७

* जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार असल्याचा अंदाज ब्रिटीश अर्थविषयक संस्था HSBC ने व्यक्त केला आहे.

* भारताला प्रभावशाली अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आर्थिक सुधारणांमध्ये सातत्य आणि सामाजिक क्षेत्रावर लक्ष ठेवावे लागेल.

* देशातील सामाजिक क्षेत्रातील भांडवल पुरेसे नसून आगामी काळात आरोग्य व शिक्षणावर निधी खर्च करावा लागणार आहे. तसेच राजकीय आर्थिक स्थैर्य, उद्योग वाढीस चालना, व काटेकोर नियमांचे पालन करावे लागेल.

* आगामी दहा वर्षात जपान आणि जर्मनीसारख्या अर्थसत्ताना मागे टाकत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होत आहे. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे विकासदरात वाढ होण्यास मदत होणार आहे.

* मागील वर्षी २०१६-१७ मध्ये देशाचा विकास दर ७.१ एवढा होता, तो २०१७-१८ मध्ये कमी होईल. मात्र आगामी वर्षात शाश्वत विकासाच्या आधारे विकासदराची मेट्रो सुसाट सुटेल.

* रोजगारविरहित विकासावर भाष्य करताना HSBC ने आगामी १० वर्षात भारतामध्ये १ कोटी २० लाख रोजगार तयार होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.