शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

उत्तर कोरियावर चीनकडून कच्या तेलाच्या निर्यातीवर निर्बंध - २४ सप्टेंबर २०१७

उत्तर कोरियावर चीनकडून कच्या तेलाच्या निर्यातीवर निर्बंध - २४ सप्टेंबर २०१७

* उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. तसेच उत्तर कोरियातील कोळसा, कापडाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.

* अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरून दबाव वाढत आहे. त्यावर चीनने हा निर्णय घेतला आहे.

* उत्तर कोरियाने अणुचाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने तसेच अमेरिकेने काही नियम व निर्बंध कोरियावर लादले.

* चीन हा कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियावर मोठा फटका बसला आहे.

* संशयास्पद अणू स्फोटामुळे उत्तर कोरियात ३.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.