गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - २९ सप्टेंबर २०१७

ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - २९ सप्टेंबर २०१७

* इतनी शक्ती हमे दे न दाता, ही प्रार्थना आपल्या सुरेल स्वरांनी अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

* संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लतादीदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आले.

* ५ लाख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. विविध भाषांमधील सिनेमात एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात स्थान मिळवले.

* अहो राया मला पावसात नेऊ नका, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नाच ग घुमा कशी मी नाचू अशा प्रकारची गाणे रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील.

* त्यांनी मराठीसोबत हिंदी, भोजपुरी, बंगाली, उडिया, मारवाडी, हरियाणवी, पंजाबी, गुजराती, आणि असामी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.