सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

देशातील कुपोषण मुक्तीसाठी केंद्राचा मिशन मोड प्रकल्प - १९ सप्टेंबर २०१७

देशातील कुपोषण मुक्तीसाठी केंद्राचा मिशन मोड प्रकल्प - १९ सप्टेंबर २०१७

* बालकांमधील कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त भारत तयार करण्यासाठी आता केंद्र देशभरातील ११३ जिल्ह्यामध्ये मिशन मोडच्या धर्तीवर म्हणजेच आक्रमकपणे मोहीम राबविणार आहे.

* या मोहिमेत उत्तर प्रदेशमधील २७ जिल्हे, बिहारमधील २० जिल्हे, मध्य प्रदेशातील १२ जिल्हे. महाराष्ट्रातील नंदुरबार या एका जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे ते घटविण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.

* देशात अजूनही या जिल्हयात कुपोषणाचे प्रमाण ३८% एवढे आहे. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे.

* या जिल्ह्यात एकात्मिक बालविकास योजनेतून दहा कोटी बालकांना पोषक आहार देण्यासाठी आर्थिक तरतूद वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा आहे.

* पोषण आहाराअंतर्गत सहा वर्षाखालील निरोगी बालकासाठी दर दिवशी ६ रुपयाऐवजी ८ रुपये देणे गरोदर आणि स्तनदा मातांसाठी सात रुपयाऐवजी साडेनऊ रुपये देणे. आणि कुपोषित बालकांना ९ रुपया ऐवजी १२ रुपये देणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.