शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती डेमोक्रेटिक पक्षाच्या समितीवर - १५ सप्टेंबर २०१७

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती डेमोक्रेटिक पक्षाच्या समितीवर - १५ सप्टेंबर २०१७

* अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यावर डेमोक्रेटिक पक्षात महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

* अर्थविषयक कृती समितीच्या प्रमुखपदी त्यांना नेमण्यात आले आहे. ही समिती अमेरिकी नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे हित साधणारा अजेंडा तयार करण्याबाबत काम करणार आहे.

* ४४ वर्षीय कृष्णमूर्ती हे न्यू इकॉनॉमी टास्क फोर्सचे सहायक अध्यक्ष म्हणून सहकारी खासदार सुसेन डेलबेन, डेबी डिंगेल आणि डेरेन सोटो यांच्यासमवेत काम करणार आहेत.

* न्यू इकॉनॉमी टास्क फोर्स ही डेमोक्रेटिक पक्षाच्या महत्वाच्या पाच कृतीदलापैकी एक मानली जाते. अमेरिकेत भविष्यातील अर्थव्यवस्था साकारण्यासाठी कुशल कामगाराची मागणी कायम ठेवण्यासाठी कृती योजना तयार करावी लागणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.