रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

राज्यातील सर्व ग्रामपंचायती महानेट ने जोडणार - १८ सप्टेंबर २०१७

राज्यातील सर्व ग्रामपंचायती महानेट ने जोडणार - १८ सप्टेंबर २०१७

* 'भारतनेट' च्या धर्तीवर राज्यात 'महानेट' योजनेतुन राज्यातील ग्रामपंचायतीना इंटरनेट कनेक्टिव्हिटी जोडण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत १४ हजार ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकने जोडल्या असून पुढील वर्षांच्या अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायती महानेट ने जोडण्यात येतील.

* ग्रामीण भागातील नागरिकांना डिजीटली साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारने भारतनेट हे अभियान सुरु केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात महानेट योजना सुरु करण्यात आली आहे.

* एकूण ४००० हजार कोटीची हि योजना असून राज्य सरकार १२०० कोटी तर केंद्र सरकार २८०० कोटी रुपये उपलब्द करून देणार आहे.

* या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील सर्व शेतकरी ते लाभार्थी यांच्या खात्यात थेट रक्कम पोहोचणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.