रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व - १८ सप्टेंबर २०१७

चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व - १८ सप्टेंबर २०१७

* रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांचा भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

* स्थानिक जनतेच्या अधिकारांना न डावलता, चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याची कसरत केंद्र सरकारला करावी लागणार आहे.

* १९६० च्या दशकात चकमा आणि हाजोंग समाजातील सुमारे १ लाख नागरिकांनी बांगलादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः अरुणाचल प्रदेशामध्ये आश्रय घेतला होता.

* तेव्हापासून या लोकांचे भारतात वास्तव्य असून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने २०१५ मध्ये दिले होते.

* अरुणाचल प्रदेशांनी स्थानिक रहिवाशांनी या निर्वासितांनी नागरिकत्व देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे राज्यातील लोकसंख्येची रचनाच बदलून जाईल अशी भीती व्यक्त केली आहे.

* या निर्वासितांना अरुणाचलमधील अनुसूचित जमातीमध्ये जमिनीचे अधिकार न देता व्यवहारिक तोडगा काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.