सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

जॉयसिलिनचा १० किमी शर्यतीत जागतिक विक्रम - ११ सप्टेंबर २०१७

जॉयसिलिनचा १० किमी शर्यतीत जागतिक विक्रम - ११ सप्टेंबर २०१७

* प्रागमध्ये चेक प्रजासत्ताक केनियाच्या जॉयसिलिन जेपकोस्केई हिची बिरेल ग्रांपी रोड रेसमध्ये दहा किमी शर्यतीत विश्वविक्रमी वेळ.

* ही शर्यत ३० मिनिटापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारी पहिलीच महिला धावपटू. २३ वर्षाच्या जॉयसिलिनची वेळ २९ मिनटे ४३ सेकंद. फॅन्सी चेमुताई ३०.०६ दुसरी, तर व्हीआलाह चेपचुम्बा ३०.२५ तिसरी महिला होय.

* यापुर्वीचा ३० मिनिटे ४ सेकंद वेळेचा उचांक याच शहरात तिने प्रागमधील स्पोर्टसमो अर्धमॅरेथॉन एक एप्रिल रोजी नोंदविला होता.

* जॉयसिलिनचा यंदा तब्बल पाचवा विश्वविक्रम. एक एप्रिल रोजी तिने अर्धमॅरेथॉन १०, १५, २० किमी असे टप्पे अर्धमॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदविली होती.

* आंतरराष्ट्रीय महासंघ ट्रॅक तसेच रोडरेसचे विक्रम वेगवेगळे नोंदविते. १० हजार मीटर शर्यतीचा विश्वविक्रम २९ मिनिटे १७.४५ सेकंद वेळेचा होता.

* हा उचांक इथिपियाच्या अल्मास अयाना हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये नोंदविला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.