शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

भारतीय नौदलात कल्वरी पाणबुडीची भर - २४ सप्टेंबर २०१७

भारतीय नौदलात कल्वरी पाणबुडीची भर - २४ सप्टेंबर २०१७

* अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नौदलाला स्कॉर्पीन श्रेणीतील पहिली पाणबुडी कल्वरी पाणबुडी प्राप्त झाली. नौदल पुढील महिन्यात एका मोठया समारंभात या पाणबुडीला आपल्या ताफ्यात सामील करणार आहे.

* हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालीदरम्यान नौदलाच्या वर्तमान पाणबुड्या जुन्या ठरत होत्या. अशा स्थितीत आधुनिक वैशिट्यानी सज्ज ही पाणबुडी मिळणे महत्वाचे ठरेल.

* मेक इन इंडिया अंतर्गत निर्माण झालेली ही पाणबुडी शत्रूच्या नजरेत धूळफेक करत अचूक लक्ष्य भेदू शकते. ही पाणबुडी पाणतीर आणि नौकाविरोधी क्षेपणास्त्राची हल्ले घडवून आणू शकते.

* नौदलाच्या ताफ्यात सध्या शिशुमार श्रेणीच्या जर्मन ४ छोट्या तर सिंधूघोष श्रेणीच्या रशियन ९ मोठ्या पारंपरिक पाणबुड्या आहेत. यातील बहुतेकांनी २५ वर्षांचे सरासरी आयुष्य ओलांडले आहे.

* अशा प्रकारच्या ६ पाणबुड्या देशात निर्माण केल्या जातील. कल्वरी पाणबुडीचे टायगर शार्क असे ठेवण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.