रविवार, १० सप्टेंबर, २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील हिवराआश्रमला आयोजित - ११ सप्टेंबर २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील हिवराआश्रमला आयोजित - ११ सप्टेंबर २०१७

* ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील हिवराआश्रमला आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज जाहीर केले.

* साहित्य संमेलनाच्या १४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलढाणा येथे संमेलन आयोजित होणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने ग्रामपंचायत भागात हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे.

* हिवरा येथे विवेकानंद आश्रम या संस्थेकडे एकाचवेळी ३ हजार लोकांची निवास आणि पाच हजार लोकांची भोजन व्यवस्था आहे. व ३० ते ४० हजार रसिकांची आसन व्यवस्था करता येईल.

* हिवरा आश्रम गाव शेगाव येथून एक तास, मलकापूर जंक्शन दीड तास, तर मेहकर शहर अवघ्या १२ किलोमीटर वर आहे.

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ५ ऑकटोबर पासून सुरु होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.