मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

केंद्र सरकारकडून ५ जी दूरसंचार क्रांतीची सुरवात - २७ सप्टेंबर २०१७

केंद्र सरकारकडून ५ जी दूरसंचार क्रांतीची सुरवात - २७ सप्टेंबर २०१७

* दूरसंचार क्रांतीला गतिमान करणाऱ्या ४ जी नंतर आता ५ जी च्या स्वागताची तयारी सरकारने सुरु केली आहे. २०२० पर्यंत ५ जी चे आगमन अपेक्षित असून, त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मनोज सिन्हा यांनी केली.

* ५ जी च्या आगमनासाठी दूरसंचार खाते, माहिती, व तंत्रज्ञान खाते एकत्रितपणे काम करणार असून तिन्ही मंत्रालयातर्फे ५०० कोटी रुपयाचा विशेष निधी स्थापन केला जाणार आहे.

* हा निधी संशोधन आणि उत्पादनाच्या विकासासाठी वापरला जाईल. ५ जी तंत्रज्ञानांतर्गत शहरी भागामध्ये १० हजार मेगाबाईट प्रतिसेकंद आणि ग्रामीण भागात एक हजार मेगाबाईट प्रतिससेकंद असा वेग इंटरनेटसेवेसाठी देण्याचे लक्ष्य आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.