शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

भारतीय हवाई दलाचे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग यांचे निधन - १७ सप्टेंबर २०१७

भारतीय हवाई दलाचे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग यांचे निधन - १७ सप्टेंबर २०१७

* भारत - पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व करणारे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग वय ९८ यांचे आज निधन झाले. 

* हवाई दलाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच फाईव्ह स्टार रँकवर गेलेले ते एकमेव अधिकारी आहेत. हे पद लष्करातील फिल्ड मार्शलच्या दर्जाचे आहे. देशाच्या लष्करी इतिहासात अर्जनसिंग हे प्रेरणास्थान होते. 

* हवाईदलाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सरकारची परवानगी नसतानाही भारत पाक युद्धात अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने त्यांनी हवाई दलात नेतृत्व केले. 

[ मार्शल अर्जनसिंग यांचा परिचय ]

* १५ एप्रिल १९१९ रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर येथे अर्जनसिंग यांचा जन्म झाला. वयाच्या ४४ व्या वर्षी ते भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले होते. 

* त्या वेळीच त्यांनी १९६५ मध्ये युद्धात नेतृत्व करून अखनूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. यासाठी त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

* १९६४ ते १९६९ या काळात हे हवाईदल प्रमुख होते. तिन्ही सैन्यदलाचा विचार करता फाईव्ह स्टार रँक मिळवणारे देशाचे तिसरे अधिकारी होते. 

* निवृत्ती नंतर सरकारने अर्जनसिंग यांची १९७१ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.