बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

पदमभूषण पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून महेंद्रसिंग धोनीची शिफारस - २१ सप्टेंबर २०१७

पदमभूषण पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून महेंद्रसिंग धोनीची शिफारस - २१ सप्टेंबर २०१७

* देशाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पदमभूषण पुरस्कारासाठी बीसीसीआयने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे.

* आतापर्यंत दोनवेळा विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा महत्वाचा वाटा आहे. कसोटी, वन डे, आणि टी-२० या तिन्ही क्षेत्रात धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा उभारणीत त्याचे असलेले योगदान प्रशंसनीय आहे.

* यंदाच्या पदम पुरस्कारासाठी धोनीव्यतिरिक्त इतर कुठल्याही खेळाडूची पुरस्कारासाठी बीसीसीआयने कुठल्याही खेळाडूची शिफारस केली नाही.

* याआधी धोनीला राजीवगांधी खेलरत्न, अर्जुन, पदमश्री, अशा मानाच्या पुरस्कारासाठी गौरविण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून या पुरस्कारावर शिक्कामोर्तब झाल्यास धोनी हा पदमभूषण पुरस्कार मिळवणारा ११ वा खेळाडू ठरेल.

* याआधी सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे यासारख्या खेळाडूंना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.