सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

कर्नाटक राज्यात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण - ४ सप्टेंबर २०१७

कर्नाटक राज्यात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण - ४ सप्टेंबर २०१७

* पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने विद्यार्थिनिंना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

* या योजनेनुसार सरकारकडून पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यात येईल. पुढील वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

* सरकारी आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच प्रोफेशनल कोर्स असलेल्या शिक्षणसंस्थांमध्ये मात्र त्याचा लाभ मिळणार आहे.

* ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा जवळपास १८ लाख विद्यार्थिनींना  या योजनेचा फायदा होणार आहे.

* कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असे बोलल्या जात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.