रविवार, १० सप्टेंबर, २०१७

स्लोआन स्टीफन्सला २०१७ यूएस ओपनचे एकेरी विजेतेपद - ११ सप्टेंबर २०१७

स्लोआन स्टीफन्सला २०१७ यूएस ओपनचे एकेरी विजेतेपद - ११ सप्टेंबर २०१७

* अमेरिकेची बिगरमानांकीत स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. स्लोआन स्टीफन्स हिने अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवून महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपल नाव कोरले.

* स्लोआन स्टीफन्सचे हे आपल्या कारकिर्दीतील पहिले वहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या ८ वर्षातील पहिली बिगरमानांकीत खेळाडू ठरली.

* ग्रॅण्डस्लॅमच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठररलेली ती केवळ पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली. या विजयामुळे तिला ३.७ मिलियन डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे.

* मागील १७ सामन्यांपैकी १५ व्या विजयासोबत स्टीफन्सन अशी पाचवी गैरमानांकीत खेळाडू बनली आहे. जिने महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.