रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीत शोध घेण्याच्या प्रकल्पात गूढ संदेश मिळाल्याचा दावा - ३ सप्टेंबर २०१७

परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीत शोध घेण्याच्या प्रकल्पात गूढ संदेश मिळाल्याचा दावा - ३ सप्टेंबर २०१७

* परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रकल्पात ३ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाले आहेत. असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे.

* स्टिफन हॉकिंग्स यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात काम करणाऱ्या विशाल गज्जर यांनी दी टेलिग्रामला सांगितले की, हे संदेश नेमके कोठून आले आहेत. याची आम्हाला कल्पना नाही.

* जर कुणाला दुसऱ्या जैव संस्कृतीतील लोकांना टिपता येतील असे संदेश पाठवायचे असतील तर ते तसे करू शकतात. पण आताचे संदेश प्रगत जीवसृष्टीकडून आले असतील. असे मला वाटत नाही.

* संदेशाचे स्रोत पहिले तर त्यापेक्षा जास्त शक्यता किंवा सिद्धांत या परग्रहावरील जीवसृष्टीबाबत आहेत. आतापर्यंत तरी उत्तरापेक्षा प्रश्न अधिक आहेत.

* विश्वात कुठेतरी प्रगत जीवसृष्टी असू शकते व ते आपल्या जीवसृष्टीचा शोध घेऊ शकतात. असे त्यांनी स्पष्ट केले.

* हे संदेश सौरमाला २ अब्ज वर्षांनी असताना संबंधित दीर्घिकेतून सुटले. व त्यावेळी पृथ्वीवर जीवन नुकतेच आकार घेत होते. सुरवातीला हा सुपरनोव्हाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.

[ ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प ]

* ब्रेकथ्रू लिसन हा १०० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम असून तो २०१५ मध्ये हॉकिंग्स व मिलनर यांनी सुरु केला आहे. त्यात अनेक देशातील पथके दुर्बिणीच्या मदतीने परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहोत.

* दहा वर्षाच्या या कार्यक्रमात आपल्या आकाशगंगेच्या दीर्घिका प्रतलातील पृथ्वीजवळील त्या १००००००० ताऱ्याचा शोध घेतला जाणार आहे. पृथ्वीबाहेर जीवसृष्टी शोधण्याचा हेतू यात आहे. असे हॉकिंग्सने सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.