
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यासाठी राज्यपालाची आणि अंदमान निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली गेली.
* सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
* भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यपाल हे मूळचे उत्तरप्रदेश चे असून काही काळ लोकसभा आणि राज्यसभाचे सदस्य होते.
* बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाप्रसाद यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
* तर आसामच्या राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगदिश मुखी हे दिल्ली भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात.
* ब्रिगेडियर सेवानिवृत्त बी. डी. मिश्रा अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल असतील.
* ऍडमिरल सेवानिवृत्त देवेंद्र कुमार जोशी हे आता अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल असतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा