बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

फोर्ब्सच्या जगातील १०० उद्योजगाच्या यादीत ३ भारतीय उद्योग - २१ सप्टेंबर २०१७

फोर्ब्सच्या जगातील १०० उद्योजगाच्या यादीत ३ भारतीय उद्योग - २१ सप्टेंबर २०१७

* फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. 

* [१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माइंड्स] या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतातील रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, आणि विनोद खोसला अशी या तीन व्यवसायिकांची नावे या यादीत आहेत. 

* यापैकी लक्ष्मी मित्तल हे आर्सेलो मित्तल चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकरी आहेत, रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत, तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टिमचे सह-संस्थापक आहेत. 

* विशेष म्हणजे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत त्यांचा उल्लेख उल्लेख विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर असा केला आहे. 

* याशिवाय यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, व्हर्जीन समूहाचे रिचर्ड ब्रॅन्सन, बर्कशायर हॅथवेचे वॉरन बफे, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, न्यूज कॉर्पोरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रुपर्ट मरडॉक यांचा समावेश आहे. 

* फोर्ब्स कडून ही यादी काही निकषाच्या आधारवर तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबविणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा विचार करण्यात आला आहे. 

* बीसी फोर्ब्स यांनी १७ सप्टेंबर १९१७ रोजी फोर्ब्स नियतकालिकाची सुरुवात केली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.