बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची 'अंब्रेला' योजना - २८ सप्टेंबर २०१७

पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची 'अंब्रेला' योजना - २८ सप्टेंबर २०१७

* देशभरातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या व्यापक 'अंब्रेला' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. २०१७-२०२० आगामी तीन वर्षात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

* या योजनेसाठी २५ हजार ६० कोटी रुपये होणार खर्च होणार आहेत. यात राज्यांचा हिस्सा ६,४२४ कोटी रुपयांचा असेल. हा सगळा खर्च येत्या तीन वर्षात होणार आहे.

* [ 'अंब्रेला' योजनेची वैशिट्ये ] *

* या योजनेअंतर्गत सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, महिला सुरक्षा, आधुनिक शास्त्राची उपलब्दता, वेगवान वाहने, हेलिकॉप्टर, बिनतारी सेवा, उपग्रहाद्वारे संपर्कयंत्रणा, तसेच [सीसीटीएनएस] या बाबीचा समावेश असेल.

* याखेरीज जम्मू काश्मीर, ईशान्य भारतातील राज्ये, आणि नक्षलवादी हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या ३५ जिल्ह्यासाठी विशेष योजना तयार केली जाणार आहे.

* आंध्र प्रदेशातील अमरावती येथे अत्याधुनिक विधीविज्ञान प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे. तर जयपूर येथील सरदार पटेल वैश्विक सुरक्षा केंद्राचे आधुनिकीकरण, गांधीनगर [गुजरात], येथील दहशतवाद प्रतिबंधक केंद्रात विधिविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.