रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

आजपासून ३ दिवसीय ब्रिक्स संमेलन सुरु - ४ सप्टेंबर २०१७

आजपासून ३ दिवसीय ब्रिक्स संमेलन सुरु - ४ सप्टेंबर २०१७

* चीनमधील शियामेन येथे आजपासून ३ दिवसीय ब्रिक्स संमेलन सुरु होणार असून त्यासाठी नरेंद्र मोदी हे चीनमध्ये दाखल झाले आहे.

* शांतता, सुरक्षा, आणि खुली अर्थव्यवस्था यावर ब्रिक्स संमेलनात विशेष भर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात मंगळवारी द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

* तसेच संमेलनादरम्यान मोदीजी हे रशियाचे अध्यक्ष ब्लाडिनीर पुतीन आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल - सीसी यांचीही भेट घेतील.

* दिल्ली आणि बीजिंगने वादग्रस्त डोकलाममधील लष्कर तातडीने मागे घेण्याचा निर्णय २८ ऑगस्टला घेतल्यानंतर पहिल्यांदाच ब्राझील, रशिया, भारत, चीन, आणि दक्षिण आफ्रिका नेते या निमित्ताने एकत्र येत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.