मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

आयसीसीचे क्रिकेटचे नवीन नियम लागू - २७ सप्टेंबर २०१७

आयसीसीचे क्रिकेटचे नवीन नियम लागू - २७ सप्टेंबर २०१७

* प्रत्येक संघात सहा राखीव खेळाडू [यापूर्वी चार].

* नव्या परिणामांनुसारच बॅट आवश्यक, पंच तपासणी करणार.

* यष्टीवरील बेल दोरीने जोडली जाणार. या पद्धतीचा उपयोग यजमान क्रिकेट मंडळावर अवलंबून.

* दिवसातील सत्र संपण्यापूर्वी तीन मिनिटे आधी विकेट पडल्यास ब्रेकचा निर्णय [यापूर्वी दोन मिनिटे].

* गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर पॉपिंग क्रीजमध्ये पोचण्यापूर्वी एक टप्पा पडला तरी तो नो बॉल [यापूर्वी दोन टप्पे]

* नो-बॉलवर बाईज किंवा लेगबाईज धाव झाल्यास त्या वेगवेगळ्या मोजणार. म्हणजे नो बॉल गोलंदाजाच्या नावावर आणि त्या चेंडूवर निघालेल्या धावा अवांतर म्हणून मोजणार. [यापूर्वी अशा धावा नो बॉलमध्येच मोजल्या जायच्या]

* चेंडू क्षेत्ररक्षक किंवा यष्टीरक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाल्यास फलंदाज झेलबाद, धावबाद, किंवा यष्टिचित म्हणून बाद धरणार.

* चेंडू हाताळणे संकल्पना रद्द, ती क्षेत्ररक्षणात अडथळा अंतर्गत सामावली जाणार.

* मैदानावरील असभ्य वर्तनासाठी पंच खेळाडूस थेट रेड कार्ड दाखवू शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.