शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

जपान देणार भारताला यूएस-२ एम्फीबियस एअरक्राफ्ट - १५ सप्टेंबर २०१७

जपान देणार भारताला यूएस-२ एम्फीबियस एअरक्राफ्ट - १५ सप्टेंबर २०१७

* जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी भारतासोबत महत्वाचे करार केले असून यूएस-२ एम्फीबियस एअरक्राफ्ट हा एक महत्वाचा करार आहे.

* ज्या कराराची मागील ३ वर्षांपासून चर्चा सुरु होती. आता यावेळी जपान भारताला ती १२ विमाने विकायला तयार झाला आहे.

[ यूएस-२ एम्फीबियस एअरक्राफ्टची वैशिट्ये ]

* हे जगातील एकमात्र विमान असे आहे की जे विमान पाण्यात आणि हवेतही लँडिंग करते.

* हे विमान खवळलेल्या समुद्रातही उतरू शकते. तसेच यात लांब पल्ल्याच्या असैन्य व सैन्य अप्लिकेशन्स आहेत.

* यूएस २ सर्वात मजबूत विमानापैकी एक आहे. ३० ते ३८ किलोमीटर प्रति तास विंड स्पीडने याला समुद्रासह छोट्या छोट्या नदी तलाव व धरणात ऑपरेट केले जाऊ शकते.

* सुमारे ३० लोक व १८ वजनासह एकावेळी ते ४५०० किलोमीटर अंतर पार करू शकते. इंडियन नेवीशिवाय कोस्ट गार्ड सुद्धा या एअरक्राफ्टला ऑपरेट करेल.

* युद्धाच्या काळात एअरक्राफ्ट मधून एका वेळी ३० जवानांसह उड्डाण करू शकते. या एअरक्राफ्टची लांबी ३३.४६ मीटर तर उंची ९.८ मीटर आहे.

* एअरक्राफ्टचा विंगस्पॉन ३३.१५ मीटर तर विंग एरिया १३५.८ मीटर आहे. या एअरक्राफ्टचा स्पीड ५६० किमी प्रतितास आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.