शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम जाहीर - ९ सप्टेंबर २०१७

विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम जाहीर - ९ सप्टेंबर २०१७

* विमान प्रवाशांच्या सुरक्षेकरिता सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या धोरणाअंतर्गत केंद्रीय मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील पहिली ' नो फ्लाय ' यादी जारी केली आहे.

* यातील नियमानुसार विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना या काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्ह्याच्या प्रमाणात दोन महिन्यापासून आजीवन विमानप्रवास करण्यास बंदी घातली जाईल.

[ नो फ्लाय यादीतील गुन्ह्यांची वर्गवारी ]

* बेशिस्त शारीरिक हावभाव, शाब्दिक बाचाबाची आणि प्रमाणाबाहेरील नशापानसाठी तीन महिन्यापर्यंत बंदी.

* शारीरिक अपमानास्पद वागणुकीसाठी [ धक्का देणे, लाथ मारणे, आरोग्य स्पर्श करणे ] सहा महिन्यापर्यंत बंदी

* जीवे मारण्याची धमकी - प्राणघातक हल्ला किंवा विमानाची मोडतोड करणाऱ्यांना किमान २ वर्षासाठी, तर कमाल आजीवन प्रवास बंदी.

* या गुन्ह्यासंदर्भातील निर्णय निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीमार्फत ३० दिवसांच्या आत घेतला जाईल.

* सध्याच्या कायद्यानुसार गुन्हेगाराविरुद्ध बंदीशिवाय कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.