सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन - २५ सप्टेंबर २०१७

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन - २५ सप्टेंबर २०१७

* सिंहासन, झिपऱ्या, मुंबई दिनांक अशा एकाहून एक सरस कलाकृतीनी मराठी साहित्यविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन झाले. ते वयाने ७५ वर्षाचे होते.

* चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक, आणि ललित लेखन या विविध माध्यमातून विपुल लेखन केले.

* त्यांच्या सिंहासन, मुंबई दिनांक, या दोन कादंबऱ्या हा चित्रपटही अजरामर ठरला. जवळपास ३० वर्षे पत्रकारिकेत असलेल्या केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया फ्री प्रेस जर्नल अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकातून पत्रकारिता साधू यांनी केली.

* त्यांनी ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. २०१५ मध्ये त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाला होता. याचवर्षी अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

* कादंबऱ्या - झिरप्या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट

* कथासंग्रह - एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची, बिनपावसाचा दिवस, बेचका,मंत्रजागर, मुक्ती, आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती.

* ललित लेखन- अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सुभापूर्व, सहकारधुरीण चरित्र 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.