सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

रोहिंग्या निर्वासित देशासाठी धोकादायक - १९ सप्टेंबर २०१७

रोहिंग्या निर्वासित देशासाठी धोकादायक - १९ सप्टेंबर २०१७

* म्यानमारमध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईमुळे रोहिंग्या मुस्लिम तो देश सोडून अन्य देशाच्या आश्रयाला जात आहेत. २०१२ पासून रोहिंग्या मुस्लिम भारतात येत असून त्यांची संख्या आतापर्यंत ४० हजार एवढी असल्याचे बोलली जात आहे.

* रोहिंग्या मुस्लिम निर्वासित देशात बेकायदा वास्त्यव्य करत असून त्यांनी भारतात राहणे हा देशाच्या सुरक्षतेसाठी गंभीर धोका असल्याची भूमिका केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

* देशात बेकायदा कारवाया आणि मानवी तस्करीमध्येही रोहिंग्यांचा सहभाग, देशात सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिम असल्यामुळे सुरक्षेची संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.

* रोहिंग्या मुस्लिम दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ शकतात. देशात राहणाऱ्या बोद्ध लोकांबरोबर हिंसाचार होण्याची शक्यता आहे.

* भारतात कोणत्याही भागात राहणे, तसेच स्थायिक होण्याचा मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.