शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

भारतीय वंशाचे नेते जे. वाय. पिल्ले सिंगापूरचे हंगामी अध्यक्ष - २ सप्टेंबर २०१७

भारतीय वंशाचे नेते जे. वाय. पिल्ले सिंगापूरचे हंगामी अध्यक्ष - २ सप्टेंबर २०१७

* भारतीय वंशाचे नेते जे. वाय. पिल्ले यांची आज सिंगापूरचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. टोनी टॅन केंग याम यांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपल्याने पुढील अध्यक्षाची निवड होईपर्यंत पिल्ले हे पद सांभाळतील.

* पिल्ले यांचा जन्म सिंगापूरमध्ये झाला असून ते माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी येथे अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.

* सिंगापूरची अर्थव्यवस्था सावरण्यात आणि सिंगापूर एअरलाईन्सची भरभराट करण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव असल्याने हे महत्वाचे पद त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

* सिंगापूरमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाल्यानंतर प्रथमच हे पद रिक्त झाले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.