शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर आणणार - १० सप्टेंबर २०१७

राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर आणणार - १० सप्टेंबर २०१७

* राज्यातील सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात ५५ ते ६० हजार कोटी रुपयाची मदत घेऊन सध्या राज्यात २२% असलेले सिंचन क्षेत्र ४०% वर आणण्यात येईल अशी माहीती केंद्रीय वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीनजी गडकरी यांनी सांगितली.

* नदीजोड प्रकल्प - महाराष्ट्र आणि गुजरात सरकारच्या संयुक्त सहकार्यातून दमणगंगा - पिंजाळ नदीजोड प्रकल्प उभारण्याचे काम येत्या तीन महिन्यात सुरु करण्यात येईल. आणि असा हा देशातील पहिलाच नदीजोड प्रकल्प असेल.

* याशिवाय तापीच्या एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या [गोदावरी] खोऱ्यात नेण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच पार - तापी - नदीजोड प्रकल्पही हाती घेण्यात येणार असून दोन्ही प्रकल्पावर २० हजार कोटी रुपयाचा खर्च येणार आहे.

* पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून महाराष्ट्राला १००० हजार कोटी तत्काळ दिले जातील तर अवर्षण आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील सिंचन प्रकल्पासाठी राज्याने मागणी केलेले १० हजार ५०० कोटी रुपये लवकर मार्गी लावण्यात येतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.