शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

भारताची अर्थव्यवस्था दमदार प्रगती साधेल - १६ सप्टेंबर २०१७

भारताची अर्थव्यवस्था दमदार प्रगती साधेल - १६ सप्टेंबर २०१७

* देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर सुरवातीला थोडासा धक्का जाणवेल. परंतु दुसरी व तिसरी तिमाही सरताच हि प्रक्रिया स्थिरावल्याने आणि अर्थव्यवस्थेला प्रगतीची दमदार वाटचाल सुरु झाल्याचे आपल्याला दिसून येईल.

* असे फीच समूहाची उपकंपनी असलेल्या इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित सहानी यांनी सांगितले.

* नोटबंदीमुळे आता रोकड अधिक शिल्लक राहील. बँकांच्या ठेवीवरील व्याजदर कमी होत असून खासगी क्षेत्रातील भक्कम बँका व म्युच्युअल फंड यांच्याकडे कल दिसून येत आहेत.

* बॅंकेतर वित्तीय संस्थाही किफायतशीर घरबांधणी तसेच छोट्या व मध्यम उद्योग क्षेत्रांना कर्जपुरवठा करून प्रगती साधत आहेत. अशा रीतीने एकूण वाटचाल कर्जपुरवठ्यावरून कर्जरोख्याकडे सुरु आहे.

* तरी भारताची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आम्ही आमचे आठवे केंद्र पुण्यात सुरु केले असून आता आम्ही पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.