गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आजपासून धावणार - २२ सप्टेंबर २०१७

चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आजपासून धावणार - २२ सप्टेंबर २०१७

* चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आजपासून धावायला सज्ज झाली असून बीजिंग ते शांघाय अशा दोन महत्वाच्या शहरांना बुलेट ट्रेन जोडणार आहे.

* ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन दोन्ही शहरामधील १,२५० किलोमीटरचं अंतर अवघ्या साडेचार तासात पार करेल. फ्युशिंग असं या ट्रेनच नाव आहे.

* चीनमध्ये सहा वर्षानंतर इतक्या वेगाने पुन्हा एकदा बुलेट ट्रेन धावते आहे. याआधी ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावायच्या पण एका अपघातानंतर या गाडीचा वेग कमी केला होता.

* आता आजपासून ह्या फ्युशिंग गाडीचा सरासरी वेग ३५० तर जास्तीत जास्त वेग हा ४०० किलोमीटर प्रतितास होणार आहे.

* या ट्रेनचा आपत्कालीन परिस्थितीचा वेग आपोआप कमी होणार आहे. तर आता बिजींग ते शांघाय अंतर कापण्यासाठी ३ ते ४ तास असणार आहे. या ट्रेनचे आयुष्य फक्त ३० वर्षाचे असणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.