बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

देशातील रोजगारासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना - ७ सप्टेंबर २०१७

देशातील रोजगारासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना - ७ सप्टेंबर २०१७

* निर्यातीला प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीवर भर देण्याच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी विविध मंत्रालयाचे सचिव आणि काही क्षेत्रातील तज्ञ अशा १५ जणांच्या टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

* देशातील रोजगारक्षम कर्मचाऱ्यांना मोठ्या नोकऱ्यांच्या अपेक्षा असल्या तरी त्यांची पूर्तता पुरेशा प्रमाणात होताना आढळत नाहीत व त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी किंवा कनिष्ठ पातळीवर काम करण्याची प्रवृत्ती मोठी आहे.

* तसे रोजगार उपलब्द होत नसल्याची स्थिती सध्या देशात आहे. यासाठी संघटित क्षेत्राच्या विस्ताराची आवश्यकता असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आणि रोजगार पुरवठा क्षमता असणारे प्रमुख क्षेत्र म्हणून निर्यातक्षम उद्योगाचे क्षेत्र मानले जात असल्याने त्यावर भर देण्यात येईल.

[ टास्क फोर्स गटाच्या कार्यकक्षेतील मुद्दे ]

* वस्तू व सेवा क्षेत्रात, तसेच कमी वेतनमानाच्या क्षेत्रात निर्यातक्षम व रोजगारक्षम उद्योगांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे रोजगार उपलब्दतेसाठी कृतीयोजना तयार करणे.

* रोजगारक्षम अशा क्षेत्रात विभागवार [ सेक्टर स्पेसिफिक ] सूचना करणे व त्यामध्ये सरकारतर्फे कोणता धोरणात हस्तक्षेप आवश्यक आहे याबाबत शिफारशी सादर करणे.

* उच्च रोजगारसंधी असलेल्या सेवाक्षेत्रातील व्यापारवृद्धीच्यासाठीच्या उपायांच्या शिफारशी.

* निर्यातमधील अडथळे शोधून ते दूर करण्याच्या उपाययोजना.

* निर्यात प्रोत्साहनसाठीच्या वर्तमान योजनांचा अढावा व मूल्यमापन.

* निर्यात ऋण, व्यापार सुविधा, आणि यासंबंधीच्या लॉजिस्टिक बाबतचे मुद्दे, अडचणी दूर करण्याचे उपाय. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.