सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

उत्तरप्रदेशाच्या लखनौत धावणार राज्यातील पहिली मेट्रो - ५ सप्टेंबर २०१७

उत्तरप्रदेशाच्या लखनौत धावणार राज्यातील पहिली मेट्रो - ५ सप्टेंबर २०१७

* लखनौ वासियांचे मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न आज साकार होणार आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ राजधानीत उद्यापासून मेट्रो धावणार आहे.

* राज्यातील या पहिल्या मेट्रो रेल्वेला लखनौचे खासदार व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिरवा झेंडा दाखवतील.

[ मेट्रोची वैशिट्ये ]

* ट्रान्सपोर्ट ते चारबाग या मार्गावर मेट्रो धावणार.
* पहिल्या टप्प्यातील या मेट्रो मार्गाची लांबी ८.५ किलोमीटर.
* सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मेट्रो धावणार.
* आठ स्थानकांच्या या पूर्ण मेट्रो मार्गावर वायफाय सुविधा.
* या मेट्रो मार्गावर किमान तिकीट दर १० रुपये.
* उत्तर दक्षिण कॉरिडॉरसाठी २३ किमी लांबीच्या मेट्रोसाठी ६८८० कोटी अपेक्षित. त्यातील पहिला टप्पा पूर्ण.
* या मेट्रोचे सर्वात अत्याधुनिक सिंग्नल नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा चालकासारखेच काम करते.
* माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या या ड्रीम प्रोजेकट चे भूमिपूजन ४ मार्च २०१४ रोजी झाले.
* प्रत्यक्ष कामाला २७ सप्टेंबर २०१४ ला प्रारंभ.
* गेल्या वर्षी डिसेम्बरमध्ये मुलायमसिंग यादव व अखिलेश यादव यांच्या ड्रीम प्रोजेकट मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.