गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

भारतात बालमृत्यूदरात लक्षणीय घट - २२ सप्टेंबर २०१७

भारतात बालमृत्यूदरात लक्षणीय घट - २२ सप्टेंबर २०१७

* देशात २००५ ते २०१५ या वर्षात पाच वर्षाखालील १० लाख बालकांचा जीव वाचविण्यात आला आहे. न्यूमोनिया, अतिसार, धनुर्वाद, गोवर, या आजारामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. असा अहवाल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

* २००० आणि २०१५ मध्ये पाच वर्षाखालील २.९ कोटी बालकांचे विविध आजारामुळे मृत्यू झाली असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रकडून देण्यात आली.

* २००५ पासून बालमृत्यू दरात भारताला यश आले असून जर २०००-२००५ दरम्यानच्या मृत्युदरात बदल झाला नसता तर २०१५ पर्यंत ३ कोटी बालकांचा मृत्यू झाला असता. असे ग्लोबल हेल्थ रिसर्च केंद्राचे प्रमुख डॉ प्रभात झा यांनी सांगितले.

* या अहवालात नवजात बालकांच्या मृत्युदरात घट झाल्याचे म्हटले असून एक महिना ते ५९ महिने वयाच्या बालकांच्या मृत्यूत ५.४ टक्क्यांनी घट झाली आहे.

* संयुक्त राष्ट्रांनी दिलेले बालमृत्यू दरात घट करण्याचे जागतिक ध्येय गाठण्यासाठी भारताने १ ते ५९ महिन्याच्या वयोगटातील बालकांच्या मृत्युदरात होणारी घसरण राखण्याची गरज आहे.

* त्याचप्रमाणे नवजात बालकांच्या मृत्युदरात प्रतिवर्षी ५ टक्क्यांची घट करण्याची गरज आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.