मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

आता १०० रुपयाचे नवीन नाणे तसेच ५ रु नवीन नाणे येणार - १३ सप्टेंबर २०१७

आता १०० रुपयाचे नवीन नाणे तसेच ५ रु नवीन नाणे येणार - १३ सप्टेंबर २०१७

* दोनशे रुपयाची नवीन नोट आणल्यानंतर केंद्र सरकारने १०० रुपयाचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

* तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त ५ आणि १०० रुपयाचे नवे नाणे आणण्याची घोषणा केली आहे.

* यातील १०० रुपयाच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम, तर ५ रुपयाच्या नाण्याचे वजन ५ ग्रॅम असेल, नाण्यात ५०% चांदी, ४०% कॉपर, ५% निकेल, आणि ५% झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल.

* सध्या बाजारात १,२,५ आणि १० रुपयांची नाणी चलनात आहेत. आगामी काळात यात १०० रुपयांची नाण्याची भर पडणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.