रविवार, १० सप्टेंबर, २०१७

काही नवीन विशेष चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१७

काही नवीन विशेष चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१७

* जेम्स अँडरसन या इंग्लंड गोलंदाजाने टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेणारा जगातील ६ वा गोलंदाज बनला असून तर इंग्लंड क्रिकेटचा पहिला गोलंदाज बनला आहे.

* मायक्रोसॉफ्टच्या सीईओ म्हणजेच सत्या नाडेला याने [ हिट रिफ्रेश ] नावाचे पुस्तक लिहिले असून त्यात त्याने सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पर्यंतचा प्रवासाचे वर्णन केले आहे.

* भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात BPCL ला सरकार महारत्न कंपनीचा दर्जा देण्याचा विचार करीत आहे. सध्या महारत्न कंपनीची संख्या एकूण ७ आहे.

* इंडस्ट्री चेंबर Assocham च्या एका अहवालानुसार देशात कर्नाटक राज्य उत्पादनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.

* वेटिकन पॉप फ्रान्सिस च्या निर्देशानुसार मदर टेरेसाला कोलकात्याच्या [ पेट्रन संत ] घोषित करण्यात आले आहे.

* आंध्र प्रदेश सरकार अमरावती शहरात भविष्यातील नवीन परिवहन व्यवस्था लागू करण्यास सज्ज असून भारतातील पहिला हायपरपूल विजयवाडा आणि अमरावती यांच्या दरम्यान होणार आहे. त्यासाठी प्रकल्पावर काम सुरु आहे.

* अमेझॉनने देशातील सर्वात मोठे निर्यात केंद्र म्हणून हैद्राबाद शहरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्यात केंद्र ४,००,००० वर्ग फूट च्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचे आहे.

* सुष्मिता देव यांना काँग्रेसने महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्या आसाममधील सिल्चर  लोकसभा केंद्रातील निवडून आलेल्या आहेत.

* केंद्र सरकारकडून १००० विद्यार्थ्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती  देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

* सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने ईशान्येकडील ६ राज्यांना भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

* अरबी समुद्रातील लक्षद्वीप समूहातील पराली १ हे बेट सततच्या विदारणामुळे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते.

* आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या संघाची सहमालकीन प्रीती झिंटा हिने टी-२० ग्लोबल लीग स्पर्धेत स्टेलनबॉश मोनार्ष या संघाची मालकी स्विकारली आहे.

* काळ्यापैशाविरुद्ध सरकारने कारवाई करीत, नियमांचे पालन न करणाऱ्या २ लाखाहून अधिक कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यासोबत या कंपन्यांची बँक खातीही गोठवली आहेत.

* आंध्रच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारात असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपणे जोडली जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.