शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

प्रदर्शनादिवशीच 'न्यूटन' सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी निवड - २३ सप्टेंबर २०१७

प्रदर्शनादिवशीच 'न्यूटन' सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी निवड - २३ सप्टेंबर २०१७

* मनोरंजन क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. याच ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळ्या दिग्दर्शक अमित मसुरकरचा न्यूटन सिनेमाची निवड करण्यात आली.

* फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने आज याची घोषणा केली. २६ चित्रपटातून न्यूटनला ऑस्करसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

* राजकुमार राव या सिनेमांत मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसूरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्तीसगढच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची ही कहाणी असून यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.

* राजकुमार रावने यात न्यूटनची म्हणजेच कर्मचाऱ्याची भूमिका बजावली आहे. ९० व्या अकँडमी अवॉर्ड्सच आयोजन ४ मार्च २०१८ रोजी लॉस एन्जल्समध्ये होईल.

* ऑस्कर परदेशी चित्रपटाच्या यादीत न्यूटनला स्वीडनच्या द स्क्वायर, जर्मनीच्या इन द फेड, कंबोडियाच्या फर्स्ट दे किल्ड माय फादर, पाकिस्तानच्या सावन चित्रपटाच आव्हाहन आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.