गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

देशात रस्ते अपघातात एका तासाला १७ बळी - ७ सप्टेंबर २०१७

देशात रस्ते अपघातात एका तासाला १७ बळी - ७ सप्टेंबर २०१७

* देशभरात २०१६ मध्ये झालेल्या रस्ते अपघातामध्ये तब्बल दीड लाख जणांना प्राण गमवावे लागले. देशात तासाला ५५ अपघात होत असून यात १७ जणांचा मृत्यू होत आहे.

* म्हणजेच दर मिनिटाला एक अपघात आणि चार मिनिटामध्ये एकाचा जीव जात आहे. असा अपघाताकडे वास्तवाकडे लक्ष वेधणारा [ भारतातील रस्ते अपघात - २०१६ ] हा केंद्रीय परिवहन मंत्रालयाने बुधवारी जाहीर केला.

* अहवालानुसार अपघातांची संख्या २०१५ च्या तुलनेत घटली असली तरीही, बळींची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात ४ लाख ८० हजार ६५२ अपघात झाले.

* त्यात १ लाख ५० हजार ७८५ जणांनी प्राण गमावले आहेत. तर सुमारे ५ लाख जण जखमी झाले. २०१६ मध्ये रोज सरासरी १ हजार ३१७ अपघात झाले आणि यात दररोज ४१३ जणांना अपघाती मृत्यू झाला.

* अपघाताची कारणे - वाहनचालकांची चूक, वेगमर्यादा ओलांडणे, मद्यपान, सिंग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत.

[ अहवालातील इतर मुद्दे ]

* २०१५ च्या तुलनेत अपघातांचे प्रमाण ४.१ टक्के कमी.
* मृत्युमुखी पडणाऱ्याच्या संख्येत मात्र ३.२ टक्के वाढ.
* १८ ते ३५ या वयोगटातील नागरिकांचे प्रमाण ४६.५ टक्के.
* राष्ट्रीय महामार्गावर ३० टक्क्याहून अधिक अपघात.
* अपघातात दुचाकी चालकाचे प्रमाण ३४.८ टक्के.
* हेल्मेट न वापरल्यामुळे १९.३ मृत्यू
* पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण १०.७टक्के. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.