शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

माजी हवाईदल प्रमुखांवर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी आरोपपत्र दाखल - २ सप्टेंबर २०१७

माजी हवाईदल प्रमुखांवर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी आरोपपत्र दाखल - २ सप्टेंबर २०१७

* ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने [CBI] ने आज माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

* सीबीआय न्यायालयाने विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्यासमोर दाखल केलेल्या या आरोपपत्रात त्यागी यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे.

* या प्रकरणात त्यागी यांचा पुतण्या संजीव, ऍड गौतम खेतान, मध्यस्थ मायकेल जेम्स, निवृत्त हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल जे एस गुजराल यांची नावे आहेत.

* ३५०० कोटी रुपयाच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारात ४५० कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. व्हीव्हीआयपी व्यक्तीसाठी हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार होती.

* या प्रकरणात त्यागीसह संजीव खेतान यांना गेल्या ९ वर्षी डिसेंबरला सीबीआयने अटक केली होती. सध्या हे सर्व जण जामिनावर मुक्त आहेत. या सर्वांवर फसवणुकीचे गुन्हेगारीचे कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयाचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.