गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

इस्रोच्या IRNSS - 1H दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी - १ सप्टेंबर २०१७

इस्रोच्या IRNSS - 1H दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी - १ सप्टेंबर २०१७

* भारताच्या आठव्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण आज अयशस्वी झाले. उपग्रहाच्या उष्णतारोधक कवचापासून उपग्रह वेगळा न झाल्याने हे प्रक्षेपण अयशस्वी झाल्याचे अवकाश संशोधन संस्थेने इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितले. 

* IRNSS - 1H या  उपग्रहाचे सतीश धवन उपग्रह केंद्रावरून सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपण ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही एक्सएल यांच्यामार्फत करण्यात आले. 

* प्रक्षेपानंतर ३ मिनिटे २३ सेकंदांनी उष्णतारोधक कवच उघडणे अपेक्षित होते. मात्र ते उघडू शकले नाही. त्यामुळे हे उड्डाण अयशस्वी झाल्याची घोषणा किरण कुमार यांनी केली. 

* पीएसएलव्ही अतिशय भरवशाचे प्रक्षेपक मानले जाते. गेल्या २४ वर्षात ४० उड्डाणे यशस्वी झाली असून केवळ २ अपयशी झाले.

* दिशादर्शनासाठी किमान चार उपग्रहाची आवश्यकता असते. भारताचे सध्या ६ उपग्रह पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. 
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.