बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

रवींद्र जडेजा ICC रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर - १० ऑगस्ट २०१७

रवींद्र जडेजा ICC रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर - १० ऑगस्ट २०१७

* भारताच्या रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. यावेळी त्याने बांग्लादेशच्या शाकिब अल हसन याला पिछाडीवर टाकले आहे.

* कसोटी क्रिकेटच्या फलंदाजाच्या क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराने ८८८ गुणांसह तिसरे स्थान पटकवले आहे.

* या क्रमवारीत भारताचा विराट कोहली ५ व्या तर अजिंक्य राहणे ६ व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ प्रथम तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट २ ऱ्या स्थानावर आहे.

* कसोटी गोलंदाजीत भारताचा फिरकीपटू आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे वेगवान गोलंदाज मोह्हमद शमी आणि उमेश यादव २० आणि २२ व्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.