शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

भारताने यावर्षी जागतिक किरकोळ विकास सूचकांक यादीत चीनला मागे टाकले - १८ ऑगस्ट २०१७

भारताने यावर्षी जागतिक किरकोळ विकास सूचकांक यादीत चीनला मागे टाकले - १८ ऑगस्ट २०१७

* भारताने यावर्षी जागतिक किरकोळ विकास सूचकांक यादीत चीनला मागे टाकले आहे. किरकोळ बाजारपेठेतील गुंतवणुकीसाठी जागतिक ब्रॅण्डसाठी भारत हे महत्वाचे केंद्र ठरले आहे.

* भारतीय उद्योग विश्वासाठी ही खुशखबर असल्याचे मानले जाते. रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी सीबीआरइने दक्षिण आशियाच्या इंडिया रिटेल मार्केट रिपोर्ट या अहवालात माहिती दिली आहे.

* या अहवालानुसार यावर्षी पहिल्या सहा महिन्यात ७ नव्या जागतिक ब्रॅंड्सनी देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश केला आहे.

* विकसनशील देशामध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी मोठी बाजारपेठ आहे. किरकोळ क्षेत्रासाठी भाड्याच्या हिशेबाने देशाची राजधानी कनॉट प्लेस, खान मार्केट, तसेच साऊथ एक्स आणि कोलकाता येथील पार्क स्ट्रीट हे महाग आहेत.

* तर मुंबईतील लिंकिंग रोड आणि पुणे येथील एमजी रोड परिसरातील दुकानाच्या भाड्यात घसरण झाली आहहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.