शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

इन्फोसिस कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामा - १९ ऑगस्ट २०१७

इन्फोसिस कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामा - १९ ऑगस्ट २०१७

* देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी इन्फोसिसच्या व्यवस्थापकीय एमडी आणि सीईओ पदाचा विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला.

* त्यांच्या  जागेवर यु बी प्रवीण राव यांची हंगामी एमडी व सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. सिक्का यांचा राजीनामा त्वरित स्वीकारत त्यांना पदोन्नती देत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

* कंपनीच्या पूर्णवेळ सीईओची नेमणूक ३१ मार्च २०१८ पूर्वी केली जाणार आहे. दरम्यान सिक्का यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.

* आपल्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सिक्का यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. माझ्या कामात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात होते असे त्यांनी म्हटले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.