शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

देशाचा सहामाही आर्थिक पाहणी अहवाल सादर - १२ ऑगस्ट २०१७

देशाचा सहामाही आर्थिक पाहणी अहवाल सादर - १२ ऑगस्ट २०१७

* अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यात त्यांनी सहा महिन्याची देशाची आर्थिक प्रगती कशी झाली यावर भाष्य केले.

[ अहवालातील प्रमुख मुद्दे ]

* कृषी क्षेत्रातील समस्या, शेतकरी कर्जमाफी आणि बँकिंग क्षेत्रातील बुडीत कर्जाचे वाढलेले प्रमाण यामुळे अर्थव्यवस्था अजूनही पुरेसा वेग पकडू शकलेली नाही.

* शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे एकूण मागणीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या जीडीपी ०.७ टक्के घट झाली.

* नोटबंदीचा अविकसित राज्यातील असंघटित क्षेत्राला फटका बसला.

* उद्योग क्षेत्रातमुळे मंदीमुळे महसुली उत्पन्नात घट.

* लघु सिंचन योजनांना प्रोत्साहन द्यावे.

* शेती उत्पादनाच्या प्रमाणानुसार किमती वाढणे किंवा पडण्याचे प्रकार नियंत्रित कराव्यात.

*  शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्द करून दयावे.

* रेल्वे व बंदराच्या स्वयंपूर्णतेसाठी पावले उचलावीत.

* एअर इंडियासारख्या सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणावर विशेष भर द्यावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.