बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

चालू घडामोडी २९ जुलै ते ८ ऑगस्ट - २०१७

चालू घडामोडी २९ जुलै ते ८ ऑगस्ट - २०१७

* विजयदुर्गसह रामेश्वरसह आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्यसरकारच्या संयुक्त उपक्रमाने आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे.

* बंगळुरू येथे आयोजित FIBA महिलांच्या आशिया चषक २०१७ च्या स्पर्धेच्या डिव्हिजन बी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानचा पराभव झाला. व भारताच्या बास्केटबॉल संघाने स्पर्धा जिंकली.

* यावर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो. जगात यंदाचा तो सातवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे.

* उत्तर कोरियाने २८ जुलै २०१७ रोजी ताईपेइडोन्ग २ या आंतरखंडीय लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

* जगभरात इंटरनेटचा वापर करणाऱ्या सुमारे ८३ कोटी तरुणांपैकी ३९% तरुण हे भारत आणि चीन या देशातील असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या यूएन अहवालाच्या समोर आली आहे.

* फेडरेशन ऑफ इंडिया चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज [ficci] चे पुढील महासचिव म्हणून पदासाठी संजय बारू यांची निवड करण्यात आली.

* केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात [जेएनयूआरम] महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे.

* उत्तर प्रदेश सरकारने अक्षय कुमार याला राज्याचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले आहे. असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.

* भारताचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गांधी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये भाजप उमेदवार व्यंकय्या नायडू यांना ५१६ मते पडली आणि गोपालकृष्ण गांधी यांना २४४ मते पडली.

* पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृतरित्या माघार घेण्यात आली आहे. असे अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले.

* भारतातील पाहिलं क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प हैद्राबाद कल्याणी राफेल ऍडव्हान्स सिस्टीम KRAS या भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उपप्रणाली निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन झाले आहे.

* नागरी विमान राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते बंगळुरूमध्ये हेली टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे हेलिकॉप्टरद्वारे शहरात टॅक्सी सेवा देणारे बंगळुरू हे देशातील पहिले शहर बनले आहे.

* भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI चे नवे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्ह्णून मोहम्मद मुस्तफा यांची निवड करण्यात आली.

* मोहम्मद फराह या धावकाने इंग्लंड मध्ये आयोजित IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

* इराणचे वर्तमान अध्यक्ष हसन रोहानी यांनी पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली.

* ऑलिम्पिक पदक विजेता पी व्ही सिंधू विश्व बॅडमिंटन स्पर्धेत जगात आठव्या क्रमांकावर आहे.

* ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यक भीमराव गस्ती यांचे ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.

* फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त [ महाराष्ट्र मिशन वन मिलियन ] फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे.

* नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर शाहिद खाकन अब्बासी हे पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारले आहे.

* अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफएओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन [OECD] यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

* अमेरिकेच्या कॅएलेब ड्रेसेलने जागतिक जलतरण स्पर्धेत एकाच सत्रात सलग तीन सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली.

* अमेरिकेच्या लॉस एंजिल्स या शहराला २०२८ च्या ऑलिम्पिक खेळाचे यजमानपद भूषविण्याचा मान मिळाला आहे.

* ब्लूमबर्ग इंडेक्सच्या नुसार देशातले दिग्ग्ज उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

* उच्चशिक्षितांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने [ ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस ] ची स्थापना केली आहे.

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या नव्या इमिग्रेशन पॉलिसीनुसार इतर देशातील लोकांना मेरीटच्या आधारावर अमेरिकेच्या वास्तव्याचा दाखला मिळणार आहे.

* केंद्र सरकारने मृत्यूची नोंद करण्यासाठी आधार बंधनकारक केला आहे. गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. जम्मू काश्मीर, मेघालय, आणि आसाम वगळता सर्व राज्यातील नागरिकांसाठी १ ऑकटोबर २०१७ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

* अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अणवस्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरिया या देशावर संयुक्त राष्ट्राने कडक निर्बंध लादले आहेत.

* इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बीआरडीसी या ब्रिटिश फॉर्मुला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या महाडिकने विजेतेपद पटकावले आहे.

* जमात - उद - दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने [ मिल्ली मुस्लिम लीग ] नावाने पक्षाची स्थापना केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.