रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

देशातील पहिली हेल्थ मेडिसिटी नागपुरात उभारणार - १४ ऑगस्ट २०१७

देशातील पहिली हेल्थ मेडिसिटी नागपुरात उभारणार - १४ ऑगस्ट २०१७

* भारत आणि ब्रिटन [ युके ] संयुक्त प्रकल्पाअंतर्गत देशात एकूण ११ हेल्थ मेडिसिटीचे निर्माण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

* हा प्रकल्प एकूण १५०० कोटी रुपयाचा असून त्यातून २ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मिहानमध्ये १५० एकर जागेत १५०० कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून तो ३ टप्प्यात २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे.

* या प्रकल्पात संशोधन, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसह पंचतारांकित हॉटेलचाही समावेश असणार आहे. पहिला टप्पा ३ वर्षात पूर्ण होणार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

* हा आरोग्य सेवाविषयक प्रकल्पामुळे देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूरच्या हेल्थ टुरिझमकडे वाटचाल सुरु झाली आहे. मिहानमध्ये लवकरच एम्स आणि राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटचीही स्थापना होणार आहे.

* अशाप्रकारचा प्रकल्प हा भारतात प्रथम राबविला जात असून देशातील ११ शहराची त्यासाठी निवड करण्यात आली असून नागपूर त्यापैकी एक असून सर्वप्रथम नागपुरात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.

* पहिल्या हेल्थ मेडिसिटीचे बांधकम लंडनमधील किंग्स कॉलेजच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे. हा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण होईल.

* एकूण १००० खाटांचे हॉस्पिटल येथे राहणार असून पहिल्या टप्प्यात म्हणजे ३ वर्षात २५० खाटांचे अत्याधुनिक हॉस्पिटल येथे माफक दरात उपलब्द होईल.

* ब्रिटनमधील आरोग्य सेवा ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखली जाते. त्याचा लाभ विदर्भातील लोकांना मिळेल. तसेच रुग्णालयाशिवाय संशोधन, उपचार साहित्याची निर्मिती, प्राणायाम, योगा, आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्द होतील असे जेनी ग्रेडी यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.