बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

सॅमसंगचे ली जेई योंग यांना ५ वर्षाची शिक्षा - ३१ ऑगस्ट २०१७

सॅमसंगचे ली जेई योंग यांना ५ वर्षाची शिक्षा - ३१ ऑगस्ट २०१७

* दक्षिण कोरियातील न्यायालयाने सॅमसंग या मोबाईल निर्मात्या कंपनीचे उत्तराधिकारी ली जेई योंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ५ वर्षाच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावली आहे. 

* जगातील सर्वाधिक स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपनी सॅमसंगचे ली हे उत्तराधिकारी आहेत. असून फेब्रुवारी २०१७ पासून ते तुरुंगात आहेत. 

* लाच देणे, अफरातफरी करणे, आणि विदेशात संपत्ती लपविणे असे त्यांच्यावर आरोप आहेत. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. 

* या हायप्रोफाईल प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात सुरु झाली. त्यामुळे पार्क ग्युन यांना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले. 

* ज्या करारासाठी ली यांनी लाच दिली होती, त्या करारामुळे ते सॅमसंगच्या प्रमुखपदी विराजमान होणार होते. सध्या त्यांचे वडील ली कून हे सॅमसंग समूहाचे अध्यक्ष आहेत. 

* सरकारी वकिलांनी ली यांना १२ वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती. या निकालाची अंतिम सुनावणी २०१८ मध्ये होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.