मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

सहाराच्या ऍम्बी व्हॅली सिटीच्या लिलावाला सुरवात - १५ ऑगस्ट २०१७

सहाराच्या ऍम्बी व्हॅली सिटीच्या लिलावाला सुरवात - १५ ऑगस्ट २०१७

* सहारा समूहाच्या सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड व सहारा हाऊसिंग इन्वेस्टींग कॉर्पोरेशन लिमिटेड या २ कंपन्यांनी बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या नावावर ३ कोटीहुन अधिक गुंतवणूक दाराकडून १७,४०० कोटी रुपये उकळले होते.

* सप्टेंबर २००९ मध्ये सहारा समूहाने सहारा प्राईम सिटीचा आयपियो शेअर बाजारात आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सेबीने ऑगस्ट २०१० मध्ये सहारा समूहाच्या SIRECL आणि SHICL या दोन कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

* सहाराच्या या २ कंपन्यांचे गैरव्यवहार समोर येत अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदाराचे ३६ हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले होते.

* यासंदर्भात सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना चार मार्च २०१४ रोजी अटक करण्यात आली होती. रॉय यांच्यासह त्यांच्या कंपन्यांचे संचालक रविशंकर दुबे व अशोक रॉय चौधरी यांनाही अटक करण्यात आली होती.

* तर सहारा समूहाच्या एका कंपनीच्या संचालिका वंदना भार्गव यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

* सहारा समूहाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावण्या झाल्या. २५ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदाराचे पैसे वेळेत न भरल्यास सहारा समूहाची पुण्याजवळील मालमत्ता असलेल्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश दिला.

* सहारा समूहाची लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करण्याची याचिका ९ ऑगस्टला फेटाळण्यात आली. १४ ऑगस्टला प्रत्यक्ष लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.